Sunday, June 4, 2023

🌍 गे माझे बाई

 🌍 गे माझे बाई

गे माझे बाई
कधी झालीस तू माझी आई
गे माझे बाई
कधी झालीस तू माझी ताई
गे माझे बाई
कधी झालीस तू माझी आक्का
गे माझे बाई
कधी झालीस तू माझी माई
गे माझे बाई
कधी झालात तुम्ही माझ्या बाई
गे माझे बाई
कधी झालीस तू माझी सई
गे माझे बाई
कधी झालीस तू माझी छकुली
गे माझे बाई
कधी झालीस तू गुड्डी
गे माझे बाई
कधी झालीस तू स्वानंदी
आई झालीस तू जेव्हा
पदरात शिरायचो मी तेव्हा
मायेचा सागर ओथंबून
मिठीत सारं जग विसरुन
ताई झालीस तू जेव्हा
अभ्यास घ्यायचीस तू तेव्हा
निबंध तुझ्या मुखातून
उतरती माझ्या लेखणीतून
आक्का झालीस तू जेव्हा
मागे लागायचीस तू तेव्हा
मागचा भाऊ होतो म्हणून
सांभाळायचीस जीव ओतून
माई झालीस तू जेव्हा
सारं करायचीस तू तेव्हा
छोटी बहीण तू असून
बसायचीस कधी तू रुसून
बाई झालात तुम्ही जेव्हा
पाठीवर ठेवायचा हात तेव्हा
हाताखाली शिकूनसवरुन
मारायचात कधी चुकून
सई झालीस तू जेव्हा
मैत्रिण झालीस तू तेव्हा
संकटांशी सामना करुन
धैर्य दिलेस लक्षात आणून
छकुली झालीस तू जेव्हा
रांगत आलीस तू तेव्हा
जीवन सुंदर बनवून
उत्साह दिलास वाढवून
गुड्डी झालीस तू जेव्हा
पप्पा म्हणालीस तू तेव्हा
कुशीत माझ्या शिरुन
डोळे आले भरभरुन
स्वानंदी झालीस तू जेव्हा
उर्मी दिलीस तू तेव्हा
खेळण्यातला पिझ्झा खाऊन
पोट गेले टूम भरुन
बाई जीवनी आहे म्हणून
पुरुषाला किंमत असते म्हणून
जीव सगळा देते सांडून
प्रेम घेते भांडभांडून
©️ प्रवीण अशितोष कुबल
( 9881471684 )

No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...