🌍 गे माझे बाई
माझ्या कविता
Sunday, June 4, 2023
🌍 गे माझे बाई
Friday, March 24, 2023
🛑 तुले साळंला यायाचं हाई
🛑 तुले साळंला यायाचं हाई
तुले साळंला यायाचं हाई
तुले साळंला यायाचं हाई
ए मुला , तुले साळंला यायाचं हाई
ए मुली , तुले साळंला यायाचं हाई || धृ ||
बालरक्षक आले घरी
शिक्षण घेऊनी दारी
भावी पिढी तुम्ही सारी
तुले साळंला यायाचं हाई || १ ||
निपुण भारत अभियान
शिक्षणाचं आहे वाण
शिक्षणाने होईल ते पूर्ण
तुले साळंला यायाचं हाई || २ ||
बालकांनो , शिक्षण तुमचा हक्क
तुमच्या लक्षात असुद्या पक्कं
नित्य शाळेत येऊनी अख्खं
तुले साळंला यायाचं हाई || ३ ||
शाळाबाह्य मुलं तुम्ही
शाळेकडे चला नेहमी
सुभविष्याची तुम्हां मिळेल हमी
तुले साळंला यायाचं हाई || ४ ||
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )
Sunday, February 26, 2023
माय मराठी
🛑 माय मराठी
जन्माला आलो तेव्हा
सोबतीला ती होती
समजत नव्हते काही
माय आणि मराठी पाही
मराठी झाली मातृभाषा
मायेला माझी वाटे आशा
समजावीत ती जाई
माय आणि मराठी पाही
आता थोडे समजू लागले
शब्दांचे संवाद झडू लागले
समजावू लागल्या बाई
माय आणि मराठी पाही
जास्त समजू लागले तेव्हा
मराठीही माझी माय वाटे
पुस्तकांच्या संगती पायी
माय आणि मराठी ठायी
आता सतत तिचीच सोबत
कितीही भाषा शिकलो जरी
नाळ कधी तुटणारच नाही
माय , मराठी दोन्ही आई
©️ प्रवीण कुबल
Friday, February 10, 2023
🔴 ओम नमो कुणकेश्वराय
हर हर शंभो
कुणकेश्वराय
कोकणामध्ये प्रसिध्द काशी
कुणकोबा हे स्थान
देवगड म्हणजे देवांचा गड
कुणकेश्वर महान
हर हर शंभो
कुणकेश्वराय
गोमातेने दिले दुग्ध
न्हाला देव पाषाण
ब्राम्हणाने मारिली काठी
रक्तरंजित झाला पाषाण
हर हर शंभो
कुणकेश्वराय
ब्राम्हणाने याचना केली
पुजू लागला पाषाण
स्वयंभू मूर्ती प्रकट होती
त्याला झाली जाण
हर हर शंभो
कुणकेश्वराय
भाविक येती , नवस करिती
जागृत देवस्थान
भक्तांच्या या हाकेला तो
धावून येतो छान
हर हर शंभो
कुणकेश्वराय
प्रवीण गातो तुझ्या कृपेने
स्फुरुन हे गाणं
भक्तांनो कधी विसरु नका
कुणकेश्वरला जाणं
हर हर शंभो
कुणकेश्वराय
©️ प्रवीण कुबल
Wednesday, June 8, 2022
🛑 सांघिक कार्य
🛑 सांघिक कार्य
एकट्या दुकट्याने होत नसतं
झालं तरी नीट होत नसतं
गाव करील ते रावाला जमणार नसतं
एकीचं बळच श्रेष्ठ असतं
म्हातारा आजारी पडलेला असतो
कण्हत असतो , खोकत असतो
काय करावं कळत नसतं
विचार डोक्यात येत असतो
मी गेल्यावर कसं होणार ?
मुलं शेती कशी करणार ?
शेत शिवार हेच स्वप्न दिसतं
स्वप्न सत्यात उतरत नसतं
बापाने केला लई इचार
पोरं हुती शिकल्याली चार
शेतीच्या बाबतीत अगदीच ठार
खायला काळ आन भुईला भार
बोलावलं त्यांना केलं एकत्र
घेतलं त्यांचं एकच सत्र
एक एक काडी आणायची मात्र
झाली पोरं बापाचे छात्र
काड्या बांधून केली मोळी
मोडा आता सायंकाळी
मोळी काही मोडेना
पोरांना काही सुचेना
आता मोळी सोडून दिली
एक एक काडी वेगळी झाली
काडी पटकन मोडून गेली
पोरं सगळं समजून चुकली
बाप आमचा भारीच हुशार
पोरं झाली एकत्र चार
मिळून उचलू कोणताही भार
सांघिक कार्य हेच खरे सार
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली
Thursday, June 2, 2022
🛑 पहिला पाऊस
🛑 पहिला पाऊस
पहिला पाऊस
पाहिला पाऊस
पूर्वीचा पाऊस
आताचा पाऊस
पावसाच्या सरी
पावसाची परी
सर्वांच्या घरी
येते तरतरी
इंद्रधनुष्य घेऊन येतो
ऊन पाऊस घेऊन येतो
पहिल्या पावसाचा वास
खरपूस खरपूस नाकात जातो
छत्री बरोबर नेलेली नसते
भर पावसात फजिती उडते
छत्री असली तरीही
तीही उलटी होत राहते
रेनकोट घातला तरी
पाऊस भिजवायचा सोडत नाही
ज्याची त्याची फजिती बघत
आपण आपला बरसत राहतो
पक्षी घरट्यात आसरा घेतात
साप बिळातून बाहेर येतात
माकडे उड्या मारत राहतात
माणसे घरात सुखात असतात
झाडे मस्त न्हाऊन घेतात
आनंदाने डोलत राहतात
वाटा सगळ्या नद्या होतात
सैरावैरा पळत सुटतात
शाळेत मुले जात असतात
वाटेत विजा चमकत असतात
सुट्टी पडावी म्हणून
भोलनाथाकडे नवस बोलतात
शेतकरी मात्र आनंदतात
नांगर घेऊन बाहेर पडतात
भिजून ओलेचिंब होतात
कामे करूनच घरी येतात
घरी भजीचा वास येतो
वासानेच अर्धी खाऊन होते
तळलेल्या भजीसाठी
घराचे छोटे हॉटेल होते
बाबा आई नोकरीला जातात
ताई दादा शाळेत जातात
छोटे कंपनी कागदी होड्या सोडतात
होड्या कधीच वाहून जातात
असा असतो पहिला पाऊस
नको रे तू निघून जाऊस
तुझ्यासोबत आमच्या खाऊस
रंगत येते बहीण भाऊस
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
🛑 निसर्ग माझा मित्र
🛑 निसर्ग माझा मित्र
कधी तू कधी मी एकत्र येताना
निसर्ग असतो तेथे मस्ताना
आल्हाददायक वाटतं भटकताना
हसताना , खेळताना , ऐकताना
पक्षी कुठून कुठून येताना
ऐकू येतात गीत नवे गाताना
तयांचे मधुर कूजन ऐकताना
देतात कसे ते एकावर एक ताना
चतुष्पाद पाहावे इकडे तिकडे बागडताना
खुश असती ते निसर्गात वावरताना
मुक्त मन ठेवावे आपलेही जाताना
एकाकी असलो तरी वाटत नाही एकटेपणा हरवताना
निसर्ग प्रत्येकाचा मित्रच हवाना
शेतकऱ्यांना , मुलांना आणि जवानांना
हास्य नित्य पाहावे विलसताना
सोडूनि जाताना किंवा मरताना
©️ प्रवीण कुबलसर , कणकवली
🌍 गे माझे बाई
🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...
-
🛑 पहिला पाऊस पहिला पाऊस पाहिला पाऊस पूर्वीचा पाऊस आताचा पाऊस पावसाच्या सरी पावसाची परी सर्वांच्या घरी येते तरतरी इंद्रधनुष्य घेऊन येत...
-
🛑 तुले साळंला यायाचं हाई तुले साळंला यायाचं हाई तुले साळंला यायाचं हाई ए मुला , तुले साळंला यायाचं हाई ए मुली , तुले साळंला यायाचं हाई ||...
-
🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...

.jpeg)



