🛑 क्षमा
दया , क्षमा आणि शांती
येत असतात संगती
देव तेथेचि वसती
की करती तिथे वस्ती ?
करता आली पाहिजे दया
नाहीतर जाईल सर्व वाया
क्षमा याचना ज्यांच्या ठाया
बनतील शांततेच्या राया
क्षमा करणे गुण चांगला
म्हणती मानव आहेचि भला
जे देती फुकटचा सल्ला
अवगुणांचा असेचि गल्ला
अंगी नम्रता धरु जरा
अहंभावा मागेचि सारा
क्षमेची जवळीक तुम्ही हो करा
हाचि असे मानवतेचा झरा
सुख समृद्धी येईल जीवनी
जर कृतज्ञता जपाल मनोमनी
ठराल तुम्ही हो जगीचे ज्ञानी
रीत व्हावी सकलांची जनीमनी
चूक होणे हा जरी असे मानवधर्म
असू शकते कदाचित एखादे कुकर्म
जाणून घ्यावे सत्यासत्याचे मर्म
क्षमा करणे हाचि आहे अपुला धर्म
फुकाची प्रतिष्ठा काय असे कामाची
माफ करण्या काय गरज धामाची
त्यासाठी वाचा रामरक्षा रामाची
नका उगा वाढवू रागाची माची
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( कणकवली )



