🛑 माय मराठी
जन्माला आलो तेव्हा
सोबतीला ती होती
समजत नव्हते काही
माय आणि मराठी पाही
मराठी झाली मातृभाषा
मायेला माझी वाटे आशा
समजावीत ती जाई
माय आणि मराठी पाही
आता थोडे समजू लागले
शब्दांचे संवाद झडू लागले
समजावू लागल्या बाई
माय आणि मराठी पाही
जास्त समजू लागले तेव्हा
मराठीही माझी माय वाटे
पुस्तकांच्या संगती पायी
माय आणि मराठी ठायी
आता सतत तिचीच सोबत
कितीही भाषा शिकलो जरी
नाळ कधी तुटणारच नाही
माय , मराठी दोन्ही आई
©️ प्रवीण कुबल
.jpeg)
No comments:
Post a Comment