Tuesday, March 29, 2022

🛑 माझे स्वप्न

🛑 माझे स्वप्न

माणसं किती स्वप्न पाहतात नाही का ? 

त्यांना काय काय व्हायचं असतं ?

जगातील विलक्षण आणि भलतंच काहीतरी

स्वप्नं बाळगतात महत्त्वाकांक्षी कसली कसली

ती होतात पुरी का कोण जाणे ? 

रोज एक नवे स्वप्न असते जागेपणी

त्यांच्या स्वप्नात खरोखर जग जगत असतं

मग मी काय त्याच जगातला ना ! ! !

मी ही तसाच स्वप्नं उराशी बाळगतो

होईल पूर्ण म्हणून प्रयत्नही करु लागतो

बालपणापासून एखादं स्वप्न लादलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी झगडत राहतो आपला वेड्यासारखा

स्वप्न स्वप्नच राहतं ते पूर्ण होताना दिसत नसतं

इंजिनिअर बनायचं स्वप्न असतं

आय आय टी ची पुस्तकं आणतो

बारावीचा निकाल लागतो

गुण चांगलेच मिळालेले असतात

पण परिस्थितीचा पत्ता नसतो

ती आपलं स्वप्न पूर्ण करायला तयार नसते

मग नाईलाजाने डीएडला प्रवेश घेतो

तेच स्वप्न बनवून टाकतो

पूर्वीच स्वप्न धूसर होत शेवटी दिसेनासं होतं

शिक्षक होऊन नोकरी मिळते

नोकरीची सवय होऊन जाते

विद्यार्थी घडवू लागतो

विद्यार्थ्यांना इंजिनिअर बनवण्याचं स्वप्न पुन्हा उराशी बाळगू लागतो

मी बनलो नाही म्हणून काय झाले

माझे विद्यार्थी इंजिनिअर बनू लागतात

अनेक विद्यार्थी अभियंता झाल्याचे पाहून समाधान पावतो

माझं लग्न होतं

मुलं होतात

त्यांच्यात पुन्हा हेच स्वप्न रुजवू पाहतो

त्यांचं स्वप्न वेगळं आहे हे समजतं

माझं नि त्यांचं स्वप्न सारखं असायलाच पाहिजे असं वाटत नाही

स्वप्न हे स्वप्न असतं

ते पूर्ण होईल याची खात्रीच नसते

ते बघायला काहीच हरकत नसते

ते पूर्ण होईल याचा अट्टाहास कधीच धरायचा नसतो

हे मी यातून शिकलेला असतो

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...