Wednesday, March 30, 2022

🛑 गुरु गौरव गीत

🛑 गुरु गौरव गीत

दिन सोन्याचा आज उगवला

अमुच्या गुरुंचा गौरव झाला

सुहास्य वदनी साहेब आमुचे

चरण स्पर्श करु आम्ही तयांचे

शिक्षण विस्तार व्रत आचरिले

नित्य आम्हां मार्गदर्शन केले

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

सद्गुरु असती सदैव अमुचे

द्विकेंद्रांचे ते उद्गाते 

कुबल म्हणजे बल ज्ञानाचे

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

ज्ञानदीप जणू प्रदिप वल्ली

केंद्रशाळा संपन्न केली

प्रसार करिती मम शाळेचे

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

आशा म्हणती कुणी स्मिता 

वाढविली अमुची अस्मिता

गुणीजन बनविले बालचमुला

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

श्रीरामा तू दैवत अमुचे

विभूती जाणून घेऊ सत्वर

तांबळ भूमी सांभाळ केला

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

ब्रीद म्हणती सत्यमेव जयते 

सत्याचे आग्रह कर्ते

व्रत घेतले गायन , वादन कलांचे

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

जगदिश हे सर्व दिशांचे

शाळा समृद्धी ध्येय तयांचे

उपक्रम राबविले खेळांचे

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

इरफान जणू शिक्षण रंग

शिक्षणाचे दर्यावर्दी सारंग

गीत गायने प्रसिद्ध झाले

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

अनिता ह्या शिक्षण गीता 

पाट करिती संस्कार सरिता

केला शिक्षण प्याला नित रिता

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

अध्यापन ज्यांची सुप्रिया

विद्यार्थीजनांवर करिती माया

नवोपक्रम जाती नित्य कराया

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

छात्र धर्म ज्यांची ऋतुजा

करिती तयांचा गाजावाजा

शालेय उपक्रम उदंड केले

म्हणुनी तयांचा गौरव झाला

दिन सोन्याचा आज उगवला

असे गुरुजन आम्हां लाभले

गौरव होऊन सन्मानित झाले

आदर्श घेऊ त्यांच्याकडुनी

म्हणुनी तयांचा गौरव केला

दिन सोन्याचा आज उगवला

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...