Wednesday, April 13, 2022

🛑 क्षण

 🛑 क्षण

प्रत्येक क्षण असतो महत्त्वाचा

प्रश्न जेव्हा असतो आयुष्याचा


गाडी सुटत असताना बघतो जेव्हा

हुरहूर मनी वाटते तेव्हा

सापडली नाही म्हणून त्याचा

त्रास होतो प्रतिक्षा करण्याचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्वाचा


जन्मवेळ सुद्धा क्षणच असतो

पळ, घटिका काहीतरी असतो

अवेळी जन्म झाला तर

काळ त्यालाच भक्षण करतो

घालवून टाकतो सारी वाचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्वाचा


गाडी चालवतानाही हे होतच असतं

पापण्या मिटून चालणार नसतं

चालकाच्या हातात स्टेरिंग असतं

त्याने ते नीट चालवायचं असतं

वापर करु नये त्याने फोनचा 

रस्ता दाखवू नये त्याने वरचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्वाचा


आभाळातून पडणारा एखादा थेंब

ज्याने उगतो भूईतून अनाहूत कोंभ

माती , ऊब आणि पुरेसे पाणी

कोंभ गातो मंजुळ गाणी

हाही क्षण असतो महत्त्वाचा

नवजीवन नित्य फुलवण्याचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्त्वाचा


रागाने राग वाढत जातो

क्षणाक्षणाला तो संपवतो

प्रेमाने जग जिंकण्याचा

विडा उचलूया नाती जपण्याचा

वसा घेऊया स्वानंदी जगण्याचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्त्वाचा


फोनवर ती बोलत होती

बोलत होती की भांडत होती

शब्दाने शब्द वाढत होता

तंटा राक्षस जागृत होता

शाब्दिक खेळ काय कामाचा

क्षण एक पुरे प्रेमाचा

म्हणून प्रत्येक क्षण असतो महत्त्वाचा


©️ प्रवीण कुबल ( जयश्रीसुत )



No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...