आकाशाच्या पल्याड
काहीतरी दिसतंय
आकाश जमिनीला टेकलंय
भास फक्त होतोय
किती वर्षे झाली
पाठलाग त्याचा करतोय
पुढे जातोय तसा
गायब होत जातंय
सर्वांचं असंच होत असावं
काहीतरी दिसावं
आणि मिळत नसावं
नुसती आभासी कासवं
माणसाच्या मनाची आसवं
दिसत नाहीत कधीही
तीही जणू क्षितिजापरी
आसमंतात विलीन होणारी
घडू नये कधीही असे
जीवन अपुले जगताना
क्षितिजाच्या पलिकडले
भास अंधुक होताना
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

No comments:
Post a Comment