Wednesday, March 30, 2022

🛑 वसंतोत्सव

🛑 वसंतोत्सव

वसंत आला , वसंत आला 

मिळुनी सारे नाचू चला , गाऊ चला

ऋतुराजाची किमया न्यारी

निसर्ग सुंदर करतो भारी

स्वच्छ सुगंधित करी जगताला

वसंत आला , वसंत आला 

गुंजन करिती खग आनंदे

चतुष्पाद उल्हासित मोदे

आसमंत गुणगुणू लागला

वसंत आला , वसंत आला

पालवुनी तरुवर म्हणती

पुन्हा नव्याने आलो जगती

सुंदरतेचे रुपची ल्याला

वसंत आला , वसंत आला

शुद्ध बीजापोटी , फळे गोमटी

निसर्ग वाटी , सुमनांची ताटी

या हो या तुम्ही पर्यटनाला 

वसंत आला , वसंत आला

हेचि शिकुनी सकलजन

निर्मल करुनी अपुले मन

निसर्ग जणू ही पहिली शाला

वसंत आला , वसंत आला

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...