Friday, April 1, 2022

🛑 चैतन्याची गुढी उभारावी

नववर्षाचा दिन सोन्याचा

आला आपुल्या घरोघरी

स्वागत करुया आपण सारे

गुढी उभारु दारोदारी


गुढी उभारुन चैतन्याची

वसा घेऊया संकल्पांचा

आरोग्याला नित्य जपुया

मनी पेटवू दीप कल्पांचा 


अमृतवाणी आणू जिव्हेवर

कटू कडूपण सोडू आता

जग जिंकूया आपण सारे

माणूसकीचा वाढवू साठा


वाचावे नित्य काहीतरी ते

समृद्धीची गाऊनी गीते

विद्यांजलीचे व्रत घेऊनिया

शारदा माते नित्य पुजुया


दारी रांगोळी सडा काढुया

गोड धोड खाऊ खाऊया

अंतःकरणी सौहार्दाचा

मळा फुलवू आत्मियतेचा


©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

🌍 गे माझे बाई

  🌍 गे माझे बाई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आई गे माझे बाई कधी झालीस तू माझी ताई गे माझे बाई कधी झालीस तू माझी आक्का गे माझे बाई कधी झाली...